अपघातात मृत्यू झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांच्या घरी खासदार अशोक नेते यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली :
  आलापल्ली - एटापल्ली मार्गावर गुरुपल्ली गावाजवळ १६ जानेवारी रोजी ट्रक व एसटी बस च्या झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर १५ जण जखमी झाले.  या अपघातात मृत्यू झालेले झालेले एटापल्लीतील रहिवासी वनपाल प्रकाश अंबादे यांच्या घरी खासदार अशोक नेते यांनी भेट दिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
 आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन मृतक आंबादे च्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी लावून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.  तसेच एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचारासाठी भरती जखमी नागरिक, युवकांची आस्थेने विचारपूस केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य उपचार करण्याच्या सूचना केल्या.  याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गंपावार, माजी सभापती दीपक फुलसंगे, विस्तारक दामोदर  अरगेला, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष निखिल गादेवार, तालुकाध्यक्ष नवीन बाला, महिला आघाडी च्या तालुकाध्यक्ष सुनीता चांदेकर, प्रसाद फुल्लुरवार, महागुराम उसेंडी, प्रांजू नागुलवार, जनार्धन नल्लवार, प्रवीण आत्राम व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-20


Related Photos