महत्वाच्या बातम्या

 भगवान गौतम बुद्धांच्या अहिंसा, करुना, शांती या विचारांमुळे समाजाला आर्दश मार्ग मिळाला : आ. किशोर जोरगेवार


- मोरवा येथे तथागत बुद्ध विहाराचे अनावरण, मुर्ती प्रतिस्थापना व भिम गीत कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या महान विचारांनी आणि शिकवणीने जगाला शांतीचा संदेश दिला. समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीतुन अनेकांच्या मनात समाजासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या हिंसा, करुना, शांती या विचारांमुळे समाजाला आर्दश मार्ग मिळाला असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.


बुद्ध पौर्णिमा निमित्त लुंबिनी बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने मोरवा येथे तथागत बुध्द विहाराचे अनावरण, मुर्ती प्रतिस्थापना व भिम गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला बळीराम धोटे, दिलीप चौधरी, अभिप्रिता गजभिये, श्रीकांत साव, जि. एस फुलझेले, मोरवाच्या सरपंच स्नेहा साव, उपसरपंच भुषण पिदुरकर, प्रकाश तावाडे, यंग चांदा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारे, भास्कर नागरकर, सिताराम थेरे, गोपळराव गणफुले, बाबाराव ताजने, वानखेडे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, बुध्द पौर्णीमा साजरी करत असतांना बुध्दांनी दिलेल्या विचारांचेही अनुसरण करणे गरजेचे आहे. त्यांनी मानसाला मानुस म्हणून जगण्याचे शिकवले. लोकप्रतिनीधी म्हणुन समाजात काम करत असतांना समाजातील समस्यांबरोबरच समाजातील व्यथा, दुख समजुन त्या सोडविण्यासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. काही विद्यार्थ्यांना त्यांची समस्या माझ्या पर्यंत पोहोचवीली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आपण मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करत आहोत. यातील एक भव्य अभ्यासिका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या पवित्र दिक्षाभुमी येथे तयार होत आहे. येथे एक लक्ष पूस्तकांचा संग्रह असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.


यावेळी ते म्हणाले कि, प्रत्येकांच्या विकासाची परिभाषा वेगवेगळी असू शकते. मात्र समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय व तेथे विकास पोहोचवीने ही आमच्या विकासाची परिभाषा आहे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, नागरिकांना उत्तम आरोग्य देण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले. आज येथे आयोजित भिम गीतांच्या कार्यक्रमातुन समाजाचे प्रबोधन व्हावे, भिम गीतात समाजाला जागृत करण्याची क्षमता आहे. समाज जागृतीकरणासाठी असे आयोजन सातत्याने आयोजित व्हावे असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.


भगवान बुद्धांच्या अहिंसा, करुणा, शांती या विचारांमुळे विश्वाला एक आदर्श मार्ग सापडला. भगवान गौतम बुद्धांच्या तत्त्वामुळे मानवता हा भाव केंद्रबिंदू ठरला. दुःख मुक्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी केलेला त्याग प्रेरणादायी आहे. आज जगाला त्यांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी भगवान बुद्धांच्या मूर्तीला आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्प वाहून वंदना केली. सदर कार्यक्रमाला गावक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 





  Print






News - Chandrapur




Related Photos