युवकांनी स्वप्न उराशी बाळगून ध्येय गाठावे : पद्मश्री डाॅ. अभय बंग


- गडचांदूरचा राजा पब्लिक टस्टतर्फे ‘आरंभ’ कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
मला युवकांचा हेवा वाटतो. २१ व्या शतकातील तरूणांनी समस्यांचे परावर्तन संधीत करावे. स्वप्न उराशी बाळगून युवकांनी ध्येय गाठावे, असे प्रतिपादन पद्मश्री डाॅ. अभय बंग यांनी केले.
गडचांदूर येथे गडचांदूरचा राजा पब्लिक ट्रस्टच्या वतीने आयोजित आरंभ कार्यक्रमात पद्मश्री डाॅ. अभय बंग बोलत होते. विशेष अतिथी म्हणून माजी आमदार  ॲड. वामनराव चटप यांनी तरूणांनी नोकऱ्यांची आशा आता ठेवू नये. येणाऱ्या १० वर्षात पुन्हा एकदा उत्तम शेतीचे दिवस येतील, असे सांगितले. प्रास्ताविकातून सुयोग कोंगरे यांनी गडचांदूर परिसरातील युवकांच्या करीअरला योग्य दिशा मिळावी यासाठी आरंभ कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. डाॅ. अभय बंग यांना तरूणांनी काही प्रश्न विचारले. या प्रश्नांवर उत्तरे देत त्यांनी समाधान केले.  संकटांना डगमगू नका आरोग्याची काळजी घ्या. दारूबंदी यशस्वी करण्यासाठी लोकलढा उभारा, असे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, सामाजिक कार्यकर्ते सतिश धोटे, नगरसेवक शरद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन दीपक चाप यांनी केले. आभार प्रविण सातभाई यांनी मानले. सदर कार्यक्रमात अंबूजा फाउंडेशन, राजर्षी शाहू अकादमी आदीच्या वतीने युवकांना विविध माहिती देण्यात आली.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-19


Related Photos