महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी येथे लवकरच नवीन बस स्थानकाचे होणार भूमिपूजन : आमदार डॉक्टर देवराव होळी


- बस स्थानकाच्या जागेची केली पाहणी
- निविदा प्रक्रिया पूर्ण कार्यारंभ आदेश होऊन लवकरच भूमिपूजन होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी बस स्थानकाची चामोर्शी वासीयांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून या बस स्थानकाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता लवकरच कार्यारंभ आदेश होणार असल्याने या बस स्थानकाचे भूमिपूजन लवकरच होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी या बस स्थानकाच्या जागेच्या पाहणीच्या प्रसंगी दिली.


यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा मुरखळा माल चे सरपंच भास्कर बुरे, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, सोनापूरचे उपसरपंच शेषराव कोहळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रतीक राठी, काशिनाथ बुरांडे यांचे सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


चामोर्शी बस स्थानकाकरिता ३ कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असून या बांधकामाची संपूर्ण निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लवकरच या बस स्थानकाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर ) होणार असल्याने या कामाचे भूमिपूजन लवकरच करून बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी दिली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos