महत्वाच्या बातम्या

 पावसाचा धिंगाणा : कोल्हापुरात ढगफुटी, दिवाळीत अनेक संसार उघड्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वुत्तसंस्था / कोल्हापुरात : राज्यात परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला आहे. पुणे शहरात जोरदार पाऊस झाल्यानंतर आता कोल्हापुरात अनेक भागात पुन्हा ढगफुटी सदृश पाऊस पडलाय. मध्यरात्री जयसिंगपूर परिसरात  ढगफुटी झाल्याने अनेक घरात पाणी शिरले तर सकल भागात तीन ते चार फूट पाणी साचले होते. यामुळे ऐन दिवाळीत अनेक कुटुंबियांचे संसार उघड्यावर आलेत. कोल्हापुरात परतीच्या पावसाने धिंगाणा घातल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. पुन्हा काल रात्री बारा वाजता सुरु झालेला पाऊस मध्यरात्री तीन वाजेपर्यंत विजेच्या कडकडाटासह पडत होता. ढगफुटी स्वरुपात पाऊस झाल्याने रात्री अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने घराघरात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार पाण्यात गेलेत. तर रात्रीत अनेक कुटुंबांनी जीव वाचवत घरं सोडली. सिद्धेश्वर पार्क आणि यड्रावकर कॉलनी मधील 20 ते 25 घरं पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीत मोठे नुकसान सोसावे लागल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. दरम्यान, कोल्हापूर जवळील सांगली जिल्ह्यातही पाऊस पडला. सांगली शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप पाहायला मिळाले. शहरातील अनेक भागातील रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. त्यामुळे अनेक मार्गवरची वाहतूक विस्कळीत झाली. ही वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली.





  Print






News - Rajy




Related Photos