महत्वाच्या बातम्या

 नवरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिर्ण इमारतीमुळे रुग्णांच्या जिवाला धोका


- नवीन इमारत बांधण्याची मागणी
            
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथील दवाखान्याची वास्तु जिर्ण झाल्याने तिला निर्लेखीत करण्यात आले. तरीही शासनाचा निधी  दुरस्तीच्या नावाखाली त्या वास्तुमध्ये खर्च होत असल्याने ती डिसमेंटल करून नवीन इमारत केव्हा बांधणार? असा प्रश्न स्थानिकांमध्ये विचारला जात आहे.
प्राथमीक आरोग्य केंद्र नवरगाव पासून एक किमी. लांब परंतु वार्ड नंबर ६ मधील धुमनखेडा गावात आहे. या इमारतीच्या बांधकामाला बरेच वर्ष झाल्याने जिर्ण झाले असून त्या इमारतीचे स्लॅब मधील तूकडे, प्लास्टर खाली पडतात. शिवाय पावसाच्या दिवसांमध्ये ती गळते. त्यामुळे ती इमारत निर्लेखीत करण्याची मागणी होती. याची दखल घेऊन ती इमारत निर्लेखीत करण्यात आली आहे. या ठिकाणी इमारतीची सद्यस्थिती बरोबर नसल्याने दवाखान्यात मागील वर्षापासून महीलांना प्रसुतीसाठी दाखल केले जात नाही, किंबहुना येथे प्रसुती केलीच जात नसल्याची माहिती आहे. तसेच सर्वसाधारण पेशंट सुध्दा भर्ती ठेवले जात नाही. सकाळी ओपीडी चालवीली तर सायंकाळी बंदच असते. कुणी भर्तीसाठी पेशंट आला तरी लागलीच त्याला तालुक्याला किंवा जिल्हयाच्या ठिकाणी रेफर केले जाते. येथील कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या क्वार्टरची अवस्थाही अत्यंत बिकट आहे,अशी परिस्थिती असतांना सदर इमारत डिसमेंटल करण्याचे आदेश वरीष्ठ स्तरावरून यायला पाहिजे होते. परंतु निर्लेखीत झालेल्या इमारतीवरच आजही खर्च होत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. या ठिकाणी मागील महिन्यात अग्नीशमन यंत्रणा बसविण्यात आली असुन पुन्हा इलेक्ट्रिक फिटींगचे काम करण्यात येत आहे. शिवाय स्थानीक किंवा तालुकास्तरावर फिटींगचे साहीत्य मिळत असतांना त्याची खरेदी ही चंद्रपूर वरुन होत आहे. त्यामुळे शासनाच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य दिपक चहांदे यांनी केला आहे.
उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार व दवाखान्यावर नियंञण ठेवण्यासाठी रुग्णकल्याण समीती असते. अलीकडे याचे नांव बदलुन जनआरोग्य समीती करण्यात येऊन मागील महिन्यात नवीन समीती गठीत करण्यात आल्याची माहिती असुन नवीन समीती किंवा जुन्या समीतीच्या मागील दोन वर्षांपासून मिटींगच झाल्या नसल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा फटका मात्र याठीकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बसत असल्यामुळे शासनाने याची दखल घेऊन सदर इमारत डिसमेंटल करून नवीन इमारत बांधण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य दिपक चहांदे, ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर कंकलवार, ग्रा. पं. सदस्य भोलाराम ईदूलवार, ग्रा. पं. सदस्य सुरेश गिरडकर यांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos