कन्हैय्या कुमार विरोधातील आरोपपत्र दिल्ली कोर्टाने फेटाळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 वृत्तसंस्था / दिल्ली :
देशविरोधी भाषणे आणि घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी कुमारसह इतर विद्यार्थ्यांच्या विरोधात १२०० पानांचा आरोपपत्र कोर्टात दाखल केला होता. मात्र जूएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांच्या विरोधातील आरोपपत्र दिल्लीतील कोर्टाने फेटाळून लावला आहे.  
 फेब्रुवारी २०१६ मध्ये कन्हैय्या कुमार, उमर खालिद, अनिरबान भट्टाचार्य आणि जम्मू काश्मीरचे विद्यार्थी मुनीब हुसैन, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, उमर गुल, रईया रसूल, बशीर भट आणि बशारत यांनी जेएनयूत एक सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमात कथितरित्या देशविरोधी भाषणे आणि घोषणा दिल्या प्रकरणी  दिल्ली पोलिसांनी कुमारसह इतर विद्यार्थ्यांच्या विरोधात १२०० पानांचा आरोपपत्र कोर्टात दाखल केला होता. परंतु, कोर्टाने तो मान्य करण्यास नकार दिला. 
 दिल्लीतील कायदा विभागाची परवानगी सुद्धा घेतली नाही. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही आरोपपत्र दाखल केलाच कसा. असे खडेबोल न्यायाधीशांनी पोलिसांना सुनावले . यानंतर पोलिसांनी आपली चूक मान्य करत आप सरकारची परवानगी घेणार असे सांगितले. सोबतच यासाठी कोर्टाकडून १० दिवसांची मुदत सुद्धा मागितली आहे.  Print


News - World | Posted : 2019-01-19


Related Photos