महत्वाच्या बातम्या

 नवरगांव सीडीसीसी बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास विलंब


- नवरगाव शाखेत  पदे रिक्त असल्याने व्यवहार करण्यास अडचन

- शेतकरी कर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : चंद्रपूर जिल्हयातील सिदेवाही तालुका हा धान उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे. सदर जिल्हयात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या यांचे बॅकेचे शाखा कार्यरत आहेत. सिदेवाही तालुक्यातही तीन शाखा कार्यरत आहेत. शेतकरी हिताची ही बॅक म्हणून नावारूपास आली आहे. सदर बॅकेतुन सर्व व्यवहार सुरू आहेत परंतु आजस्थीतीत या बॅकेच्या नवरगाव शाखेत कर्मचारी कमतरतेमुळे शेतकरी यांना सर्व पीक कर्जाच्या प्रक्रिया पूर्ण करुण सुध्दा कर्ज मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सदर बँकेची सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे शाखा कार्यरत आहे. सदर शाखात मोठ्या प्रमाणात जनतेचे आर्थिक व्यवहाराची देवान घेवान सुरु आहे. सोबतच या बँकेशी रत्नापूर, नवरगाव ,नाचनभट्टी, अंतरगाव, देलनवाडी हया पाच सेवा सहकारी संस्थेमार्फत शेतकरी जनतेला पीक कर्ज वाटपाचे काम सुद्धा करावे लागते आहे .या शाखेत मोठा व्याप असल्याने सहा कर्मचारी पदे कार्यान्वीत असणे अनिवार्य आहे. पंरतु बैंकेत।कर्मचारिचा अभाव आहे. त्यामुळे जनतेच्या कामाचा खेळ खंडोबा सुरु आहे. आता शेतकरी जनतेनी मार्च महीण्यात आपले पूर्ण घेतलेले पीक कर्ज वसुल करुन नवीन पीक कर्ज घेण्यासाठी सेवा सहकारी संस्थेचे मार्फतीने अर्ज सादर केलेले आहेत. पीक कर्ज मिळण्यासाठी शेतकरी जनतेला करावी लागणारी सर्व प्रकीया पूर्ण झालेली आहे. आणी कार्यरत असणारे निरक्षक यांनी आपले काम पूर्णपणे चोख बजावलेले आहे. तरी पण कर्मचारी याचे कमतरतेमुळे सदर सर्व पात्र पीक कर्जधारक शेतकरी यांना वंचीत राहण्याची वेळ आलेली आहे.

सदर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या यांच्याकडे शेतकरी हिताची बँक म्हणून सर्व सामान्य शेतकरी जनतेकडुन पाहिल्या जाते. परंतु कागदपत्राची पूर्तता होवूनही पीक कर्ज मिळत नसल्याने आता हंगाम सुरु होण्याचे मार्गावर शेतकरी हवालदील झाला असुन त्यांना सावकारी कर्ज किंवा नातेवाईक यांच्याकडून उसणवार घ्यावे लागण्याची वेळ शेतकरी याचेवर आली आहे. तरी या बँकच्या संबधीत प्रशासकीय अधीकारी यांनी त्वरीत या गंभीर समस्येकडे लक्ष केंद्रित करून त्वरीत रिक्त असलेल्या सिदेवाही तालुक्यातील पूर्ण जागा भराव्या व शेतकरी जनतेचे अडलेले काम पूर्ण करण्यास मदत होईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी जनतेकडून केली जात आहे.

सदर या बँकेच्या नवरगाव शाखेत ६ कर्मचारी यांची आवश्यकता आहे. परंतु सध्यास्थितीत फक्त ३ कर्मचारी कार्यरत आहेत. आणी सदर रिक्त पद भरण्यासाठी लेखी पत्रव्यवहार करुण कर्मचारी यांची मागणी मागील दोन महीण्या पासुन केलेली आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. - व्ही.आर. गहाणे  शाखाधिकारी शाखा नवरगांव





  Print






News - Chandrapur




Related Photos