महत्वाच्या बातम्या

 युवकांनी जिल्हा युवा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- विविध स्पर्धांचे होणार आयोजन

-  स्पर्धानिहाय वेगवेगळी बक्षिसे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नेहरू युवा केंद्राच्यावतीने १३ मे रोजी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाद्वारे युवकांच्या कलागुणांना वाव आणि संधी मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

युवा महोत्सव तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सदर आवाहन केले. बैठकीला जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सदर जिल्हा युवा महोतस्व न्यु आर्ट कॉलेज येथे १३ मे रोजी करण्यात आले आहे.

या महोत्सवात लेखक स्पर्धा (कविता लेखन), भाषण स्पर्धा, युवा कलाकार स्पर्धा (चित्रकला), जिल्हा सांस्कृतिक महोत्सव (समूह नृत्य), छायाचित्रण स्पर्धा आणि कार्यशाळा यादी कार्यक्रम घेतले जाणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीसे तसेच प्रमाणपत्र, मेडल व ट्रॅाफी देण्यात येणार आहे.

युवा लेखक स्पर्धेचे (कविता लेखन) पहिले पारितोषिक १ हजार, द्वितीय पारितोषिक ७५०, तिसरे पारितोषिक ५००रुपये असे आहे. युवा कलाकार स्पर्धा (चित्रकला) पहिले पारितोषिक १ हजार, द्वितीय पारितोषिक ७५०, तिसरे पारितोषिक ५०० रुपये आहे. मोबाईल छायाचित्रण स्पर्धा पहिले पारितोषिक १ हजार, द्वितीय पारितोषिक ७५० तर तिसरे पारितोषिक ५०० रुपये असे आहे. भाषण स्पर्धा पहिले पारितोषिक ५ हजार, द्वितीय पारितोषिक २ हजार, तिसरे पारितोषिक १ हजार आहे.

जिल्हा सांस्कृतिक महोत्सव (समूह नृत्य) पहिले पारितोषिक ५ हजार, द्वितीय पारितोषिक २ हजार ५००, तिसरे पारितोषिक १ हजार २५० रुपये असे आहे.  सर्व  स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरु होणार असून सांस्कृतिक महोत्सव दुपारी २ वाजता सुरु होईल. सर्व सहभागी स्पर्धंकाना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी https://forms.gle/yWXfKzq7iFNZiQnj7 लिंकवर नोंदणी करता येईल.

युवा उत्सवामध्ये वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या ‍माहितीचे स्टॉल लावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांना देखील युवकांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत  सहभागी होण्याकरीता शेवटची तारीख १० मे आहे, असे जिल्हा युवा अधिकारी  शिवधन शर्मा यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos