महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा ९ मे पासून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ परीक्षेला ९ मे पासून प्रारंभ होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील चंद्रपूर जिह्यात ४३ आणि गडचिरोली जिल्ह्यात २४ असे एकूण ६७ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आली आहेत. पदव्युत्तर पदवीकरिता १६ हजार, ७५३ तर पदवी परीक्षेकरिता ७५ हजार ३३६ असे एकूण ९२,०८९ विद्यार्थी उन्हाळी परीक्षांकरिता प्रविष्ट होणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, भामरागड, एटापल्ली, आल्लापल्ली, मूलचेरा, सिरोंचा, मालेवाडा ही आठ परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील आहेत. 


असे संचालक परीक्षा व मूल्यमापन डॉ. अनिल चिताडे यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos