महत्वाच्या बातम्या

 ८ मे ला छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर (समुपदेशन मेळावा) चे आयोजन राजाराम लॉन, तुमसर येथे सोमवार 8 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात आले आहे.

शिबीरामध्ये साधारणतः 10 वी/12 वी नंतर काय करावे ? भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्त्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी, इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रोजगार व स्वयंरोजगार, शैक्षणिक व इतर कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँक, वित्तीय संस्था इत्यादी बाबत प्रमुख तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटक तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी हेमंत आवारे राहणार आहेत, असे आवाहन प्राचार्य श्रीमती पिसे यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos