श्रेयाचे राजकारण, काटोलकरांचे मनोरंजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / काटोल :
  सध्या काटोल विधानसभा क्षेत्राचे राजकारण तापले आहे. श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली आहे.  किस्सा आहे ईमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ तर्फे नोंदणी केलेल्या कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमाचा.
खरतर हे मंडळ पुनर्जिवित केले देवेंद्र फडणविस सरकारने. मंडळाकडे जमा असलेल्या निधीतुन फडणविसांनी आपल्या कल्पक बुध्दिचा वापर करून विविध कल्याणकारी योजना तयार केल्या.   या योजनांचा लाभ प्रत्येक कामगारांना झाला पाहीजे या करीता प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जबाबदारी दिली. पालकमंत्र्यांनी जिल्हा परीषद, नगर परीषद, पंचायत समीती च्या अधिकाऱ्यांना कामाला लाऊन स्थानीक जनप्रतिनिधीच्या माध्यमातुन वस्ति वस्ति, गावागावात कॅंप लाऊन कामगारांची नोंदणी करायला भाग पाडले. 
या योजनेत राजकारण होऊ नये म्हणुन नोंदणिच्या फाॅर्म वर ग्राम पंचायत सचिव, विस्तार अधिकारी, नगर परीषद, मनपा, जि.प, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची फाॅर्म वर सही असणे आवश्यक केले. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी प्रशासकीय अधिकाऱ्याना मदत केली. मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असल्याने नागपूर मधे कॅंप सुरू असल्याची माहीती काटोल मधील कामगारांना मिळाली व त्यांनी नागपूर ला जाऊन साहित्य घ्यायला सुरवात केली. ही माहीती नागपूरवरून काटोल मध्ये संघटण विस्तारासाठी आलेल्या नेत्याला कळल्यावर त्यांनी ईमारत बांधकाम कामगार मंडळ अधक्षांसोबत असलेल्या संबंधाचा वापर करून काटोल विधानसभा क्षेत्रा  साठी कॅंप मंजुर करून आणला. सरकारी ऊपक्रम असल्याने पंचायत समीतीच्या माध्यमातुन हा कॅंप राबविण्याचे ठरले. पंचायत समीती बिडीओ ने पत्र काढुन ग्रामसेवकाच्या माध्यमातुन कामगारांपर्यंत या कॅंप ची माहीती देणे अपेक्षीत असतांना पंचायत समीती सभापती ने या कॅंप चे श्रेय घेण्याच्या नादात प्रशासनाला विश्वासात न घेता स्वत:च्या लेटरपॅड वर सोशल मिडीया वरून प्रसिध्दी सुरू केली. व गावागावात दवंडी पिटवली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना या गोष्टिची भनक लागताच त्यांना वाटल की या कॅंपचे श्रेय त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्यांनी पंचायत समीती कडे धाव घेऊन माईक आणि स्टेज चा ताबा मिळवला. भरीस भर म्हणुन की काय शेकाप च्या नेत्याने सुध्दा बहेती गंगा हाथ धुत दोन मिनटाचे भाषण ठोकुनच दिले. या सर्व गडबडीत कुणी म्हणत की कामगार कल्याण विभागाची टीम आली होती पण परीस्थिती पाहुन चार पाच कर्मचारी थांबले व यंत्रांच्या सुरक्षेच्या दृष्टिने बाकीच्या टिमला वापस पाठवले तर कुणी म्हणत टीम आलीच नाही. खर काय अन खोट काय हे देवालाच माहीत. पोलीसदादा सुध्दा नेहमी प्रमाणे ऊशीरा आले. पंचायत समीती सभापती व राष्ट्रवादी काॅंग्रेस च्या नेत्यांच्या श्रेयवादाच्या राजकारणा मुळे एकीकडे बिचाऱ्या कामगारांना मनस्ताप सहन करावा लागला तर दुसरीकडे काटोलकरांचे मनोरंजन झाले. ईमारत बांधकाम कामगार मंडळाच्या अधक्षांनी पाठवलेल्या निरोपानुसार जि.प. सर्कल स्तरावर कॅंप लाऊन कामगारांना साहीत्य वाटप होईल काय ही चिंता कामगारांना असतांना या कॅंप मधे पुन्हा राडा तर होणार नाही अशी चर्चा काटोलकरांमधे आहे.   Print


News - Nagpur | Posted : 2019-01-19


Related Photos