महत्वाच्या बातम्या

 जनावर वाहतुकीचा ट्रक पळविणाऱ्या टोळीचा मोरक्या गजाआड : स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई


- एकूण ८ लाख ४० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन साकोर नागपूर ग्रामीण च्या हद्दीत ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०८.०० वा. सुमारास काही अनोळखी इसम चार चाकी वाहनातून येऊन सावनेर मोहपा बायपास रोडवर एक आयसर गाड़ी क्र. MH 40 CM 0519 या वाहनातून जनावराची वाहतूक होत असताना सदरच्या वाहनास थांबवून वाहन चालकास व वाहकास खाली उतरवून जनावरांनी भरून असलेला ट्रक जबरीने पळवून नेला अशा ट्रक मालकाच्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन सावनेर येथे अपराध क्रमांक २९६ / २३ कलम ३४१, ३९२ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या वतीने करण्यात येत होता.

३ मे २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना गोपनीय खबर प्राप्त झाली की, नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला आयसर गाडी क्र. MH ४० CM ०५१९ हे वाहन छिदवाड़ा रोडने सावनेरच्या दिशेने येत असल्याचे माहिती मिळाली. 

सदर माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून ट्रक चालकास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारला असता नाव अन्सार उर्फ इमरान खान वल्द अशरफ खान (३०) राहणार बडेगाव तालुका अमर वाडा जिल्हा छिंदवाड़ा मध्य प्रदेश असे सांगितले. त्याच्या ताब्यातील ट्रक हा पोलीस स्टेशन सावनेर येथील जबरी गुन्ह्यातील चोरीस गेलेला ट्रक असल्याने त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी अन्सार ऊर्फ इमरान खान यांनी त्याच्या इतर तीन साथीदारांसह गुन्हा केल्याचे मान्य केले. 

सदर आरोपीतांनी नमुद गुन्हा हा त्यांनी गुन्हा हा आर्थिक विवंचनेतून केल्याचे सांगून ट्रक मधील जनावर हे त्याच्या इतर साथीदारांनी नागपूर येथे विकल्याचे सांगितले नमूद आरोपी नागे अन्सार ऊर्फ इमरान खान याच्या ताब्यातून चोरीस गेलेला ट्रक आयसर गाडी क्र.  MH ४० CM ०५१९ किमती अंदाजे ८ लाख  रुपये व नगदी ४० हजार रुपये असा एकूण ८ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. 

पुढील कायदेशीर कारवाई करिता पोलीस स्टेशन सावनेर यांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच उर्वरीत ३ आरोपींताचा शोध सुरू आहे. नमूद गुन्ह्यात पकडण्यात आलेला आरोपी अन्सार उर्फ इम्रान खान वल्द अशरफ खान (३०) राहणार मु. बळेगाव ता. अमरवाडा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश हा छिंदवाड़ा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळया कलमाखालील एकूण १० गुन्ह्यांमध्ये मागील काही वर्षांपासून फरार असून मध्यप्रदेश पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतु त्यांना मिळून आला नाही. स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने विशेष प्रयत्न करून सदर आरोपीस पकडले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकूर पोहवा राजेंद्र रेवतकर, नापोशी आशिष मुंगले, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल यांच्या पथकाने पार पाडली. 





  Print






News - Nagpur




Related Photos