लोकबिरादरी प्रकल्पात आरोग्याच्या कुंभमेळ्यास प्रारंभ


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील प्रसिद्ध सेवाकेंद्र लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.१८ ते २० जानेवारी २०१९पर्यंत चालणाऱ्या शस्त्रक्रिया शिबिरात विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांनी गर्दी केली आहे. आरोग्याच्या या कुंभमेळ्याला आज (ता.१८) पासून प्रारंभ झाला आहे.
 पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या पुढाकाराने दरवर्षी येथे शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते.ही परंपरा १९८५ पासून अविरतपणे सुरू आहे. यामध्ये नागपूरच्या रोटरी क्लब व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा सिंहाचा वाटा असतो.दरवर्षी ५० ते ६० तज्ञ डॉक्टरांची चमु हेमलकसा येथे दाखल होऊन विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करतात.छत्तीसगड,तेलंगाणा व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील रुग्ण आरोग्याच्या या कुंभमेळ्यात दाखल होउन शस्त्रक्रिया करुन घेतात.दरवर्षी ३०० ते ३५० विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या जातात.
 प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. सौ.मंदाकिनी आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे शिबिराची व्यवस्था सांभाळीत आहेत. बबन पांचाळ,संध्या येम्पलवार,गणेश हिवरकर,जगदिश बुरडकर,प्रकाश मायकरकार,शारदा ओक्सा,शारदा भसारकर,रमिला वाचामी, सविता मडावी,जुरी गावडे,अरविंद मडावी,शंकर गोटा,सुरेंद्र वेलादी, विनोद बानोत,शांता पोरतेड,माधुरी कोसरे,प्रियंका संगमवार प्रेमिला मडावी,दिपमाला भगत, प्रियंका सडमेक इत्यादी लोकबिरादरी हाँस्पिटलचे कर्मचारी सहकार्य करित आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-18


Related Photos