महत्वाच्या बातम्या

 मार्कंडा वनपरिक्षेत्रात कार्य करणारे सर्प मित्रांना सुरक्षा किटचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : वनविभाग आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कंडा (कं) प्रादेशिक येथे आज ०३ मे २०२३ रोजी मा.पि.डी. बुधनवार प्रकाष्ट निष्कासन अधिकारी आलापल्ली वनविभाग आलापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली तथा सौ. बेबी बुरांडे सरपंच, ग्रामपंचायत आष्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा.कु.बी.बी. राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कडा (कं) यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र कार्यालय मार्का अंतर्गत येत असलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष, पदाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी, मजुर, फॉयर मजुर, तसेच मार्कंडा वनपरिक्षेत्रात कार्य करणारे सर्प मित्र यांना एकत्रित बोलावून पावसाळ्यात व हिवाळ्यात जंगलातील किटक, सर्प यांच्या पासून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्हावी म्हणून सुरक्षात्मक साहित्य शूज, पॅन्ट, टि-शर्ट साहित्यांची किट इत्यादींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. पि. डी. बुधनवार प्रकाष्ट निष्कासन अधिकारी आलापल्ली वनविभाग आलापल्ली. तसेच कार्यक्रमाची प्रस्थावना आय. पी. मांडवकर क्षेत्रसहाय्यक रेगेवाही यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एस. मेश्राम वनरक्षक कोपरअल्ली यांनी केले व आभार आय. पी. मांडवकर क्षेत्रसहाय्यक रेंगेवाही यांनी मानले. 


तसेच कार्यक्रमाला उपस्थित डी. एम. शेळके वनपाल, आर . एस. आत्राम क्षेत्रसहाय्यक कोनसरी, एन. यु. वडेट्टीवर क्षेत्रसहाय्यक गुंडापल्ली, आकाश एस. शेरकी वनरक्षक, एस. आर. खापरे वनरक्षक, आर. व्ही. दंडिकवार वनरक्षक, कु. एच. एम. मडामे वनरक्षक, जे. पी. गोवर्धन वनरक्षक एस. जी. हजारे वनरक्षक एम. एम. सडमेक वनरक्षक, व्ही. एस. बागडे वनरक्षक, पी. एच. परसवार वनरक्षक बी. पीलिपटे वनरक्षक महेश मडावी वनरक्षक, तसेच कार्यालयीन कर्मचारी सर्व उपस्थित होते.






  Print






News - Gadchiroli




Related Photos