महत्वाच्या बातम्या

 गडचांदूर येथे बस स्थानकासाठी वंचित बहुजन आघाडी चे भीक मागो आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : काल २ मे ला गडचांदूर येथे बस स्थानक करिता भीक मागों आंदोलन करण्यात आले. औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाणारे गडचांदूर शहराला आजपर्यंत बसस्थानक नाही आहे. नगर परिषद गडचांदूर येथे मागणी केली असता आमचेकडे जागा आणि निधी नाही असे सांगितले. म्हणून वंचित बहूजन आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने राज्यसरकारचा निषेध नोंदवत भव्य भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
गडचांदूर शहर मूख्य बाजार चौक ते राजूरा कोरपना मुख्य मार्गावरून भीक मागत संविधान चौकात आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे व महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता गौरकार यांनी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात केली.
बस स्टँड आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, गडचांदूर ला बस स्टँड झालेच पाहिजे, भीक द्या भीक द्या कंगाल सरकारला भीक द्या अश्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यादरम्यान गडचांदूर शहरातील प्रत्येक दुकांदाराकडून प्रतिकात्मक भीक मागत बस स्थानकाचे महत्व सांगण्यात आले.
भीक मांगो आंदोलन वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कविता गौरकार, जेष्ठ नेते रामदास चौधरी, जिल्हा महासचिव अलका मोटघरे, तालूका संघटक अमोल निरंजने, जिवती तालूका अध्यक्ष बालाजी सोनकांबळे, जेष्ठ सल्लागार ललिता गेडाम, धीरज तेलंग जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन, माया दुर्गे, बेबीताई वाघमारे, आशा सोनडवले, सरोज दुबे, वैशाली दूधगवळी, जया खैरे, सुजाता वाघमारे, रत्नमाला वाघमारे आदी असंख्य महिला पुरुष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos