महत्वाच्या बातम्या

 कोरची : अवकाळी पावसाने मोहुर्ले कुटुंबीयांचे संसार आले उघड्यावर


- सुदैवाने जीवित हानी नाही

 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : मागील दोन दिवसापासून सतत येत असलेल्या पावसामुळे कोरची शहरातील वार्ड क्रमांक 16 येथील रहिवासी नानाजी मोहुर्ले यांच्या घरातील भिंत कोसळून पडल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. नानाजी मोहुर्ले यांची परिस्थिती हलाकीची असून ते आपल्या कुटुंबीयांसोबत मातीच्या घरात राहत असून अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नानाजी मोहुर्ले यांच्या समवेत त्यांच्या घरात त्यांची पत्नी एक मुलगा व एक मुलगी राहत असून घटनेच्या वेळी नानाजी मोहुर्ले हे कामानिमित्त बाहेर गेले होते. कुटुंबातील सदस्य हे गावी गेले असल्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली परंतु आता आपण उदरनिर्वाह करावे तरी कसे? असा प्रश्न मोहुर्ले कुटुंबीयांना उद्भवत आहे.


नानाजी मोहुर्ले हे शेतकरी असून त्यांना दुसरा कुठलाही जोडधंदा नसून शेतीच्या भरवशावर त्यांचे उदरनिर्वाह चालते. परंतु मागील काही दिवसांपासून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांची हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झाली असून अशा कठीण परिस्थितीत आपल्या जीवनाची गाडी चालवायची तरी कशी हे मोहुर्ले कुटुंबाला कळेनासे झाले आहे.


काही दिवसानंतर आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करू अशी अपेक्षा बाळगून नानाजी हे शेतावर राब राब राबतात परंतु अचानक झालेल्या नुकसानीमुळे त्यांना धक्का बसलेला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नानाजी मोहुर्ले यांनी केली आहे.

 

नगराध्यक्ष यांनी दिली भेट
सदर घटनेची माहिती प्राप्त होतात नगरपंचायत कोरची येथील नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे यांनी नानाजी मोहुर्ले यांच्या घरात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. नानाजी यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याची हमी त्यांनी यावेळी दिली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos