चंद्रपुरात दोन गुंड भावांची निर्घृण हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर :
रमाबाई नगर येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन भावंडांची बुधवारी रात्री किरकोळ कारणावरून निर्घृण हत्या करण्यात आली.  सोनू साव (२८) व गुड्ड साव (३२) असे हत्या करण्यात आलेल्यांची नवे आहेत.   मारामारी, बळजबरी, चोरी यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेल्या या भावंडांची बल्लारपूर बायपास मार्गावरील रमाबाई नगर येथे दहशत होती.
या घटनेतील मुख्य आरोपी बापू ऊर्फ मोहन पेंदाम (३३) याच्यासोबत साव भावंडांचा वाद होता. बुधवारी रात्री बापू व या दोन भावंडांमध्ये वाद झाला. शाब्दिक वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. बापू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार करून गुड्ड व सोनू यांची हत्या केली. दोन्ही भावंडांचे मृतदेह बराच वेळ रस्त्यावर पडून होते. रमाबाई नगरातील कोणीही भांडण सोडवण्यासाठी समोर आले नाही. रामनगर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन तपासचक्र फिरवत पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी बापू ऊर्फ मोहन पेंदाम याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला अटक केली. दरम्यान, या हत्याकांडातील अन्य आरोपी फरार आहेत.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-18


Related Photos