नवीन वीजजोडण्यासाठी ऑनलाईनव्दारे दोन महिन्यात सुमारे १ लाख ७ हजार अर्ज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  शहरी भागातील ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचे अर्ज केवळ ऑनलाईनव्दारेच करावे, या महावितरणच्या आवाहनास ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून मागील दोन महिन्यात सुमारे  १ लाख ७ हजार ३४८ ग्राहकांनी नवीन वीजजोडण्यांसाठी महावितरणकडेऑनलाईन अर्ज केले असून त्यांना वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
 नवीन ग्राहकांना पारदर्शकपणे व त्वरित वीजजोडणी मिळावी, यासाठी महावितरणने मोबाईल ॲप, संकेतस्थळ व हेल्पडेस्क अशा विविध सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शहरी भागातील ग्राहकांसाठी १ नोव्हेंबर २०१८ पासून नवीन वीजजोडणीचे अर्ज ऑनलाईनव्दारेच करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच ग्राहकांना ऑनलाईनव्दारे अर्ज करण्यात येणाऱ्या अडचणी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सोडवून ऑनलाईनव्दारेच अर्ज करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.  
नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ या दोन महिन्यांत महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ९३ हजार ९० ग्राहकांचे तर मोबाईल ॲपव्दारे १४ हजार २५८ ग्राहकांचे नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय ऑनलाईन संबंधित विविध स्त्रोतांकडून मागील दोन महिन्यांत सुमारे २ लाख २४ हजार २४२ नवीन ग्राहकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. याठिकाणी वीजजोडण्या देण्याचीप्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्राहकांनी नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाईन सुविधेचाच लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-17


Related Photos