महत्वाच्या बातम्या

 बालाजी स्टडी सर्कल व एनएसपीसीचे विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेस झाले पात्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नुकताच जाहिर झालेल्या जेईई मेन्स च्या निकालात बालाजी स्टडी सर्कल व एनएसपीसी चे ११ विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेला पात्र ठरले आहेत.

सदर परीक्षेमध्ये जयंत आनंदपवार या विद्यार्थ्याने पहिल्या सेशनला ९७ % व दुसऱ्या सेशनमध्ये ९६ % मिळवून आव्वल राहिला. याशिवाय नील श्रीवास्तव याने ९१ % गुण प्राप्त करुण नाव लौकिक केले आहे.

यामध्ये जेईई ऍडव्हान्स परीक्षेमध्ये जयंत आनंदपवार, नील श्रीवास्तव, शिवम कुरवटकर, समय रामटेके, आयुष चलाक, प्रियांशु मडावी, कल्पक शेंडे, विनीत रामटेके, तन्वी पुण्यप्रेडिंवार इ. विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

यावेळी गुणवंत विद्यार्थी देशातील विविध आयआयटी मध्ये प्रवेश मिळवून जिल्ह्याचे नाव लौकिक करू, असे मानस व्यक्त केले आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, बालाजी स्टडी सर्कल व एनएसपीसी चे मार्गदर्शक शर्मा सर, किटे सर व गौतम सर यांना दिले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos