आरमोरी नगर परिषद निवडणूक, नाराज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी करून वाढविली पक्षांची डोकेदुखी


- आज ठरणार निवडणूकीची दिशा
- चिन्ह वाटप होणार, प्रचाराला गती मिळणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
 प्रतिनिधी / गडचिरोली 
: येत्या २७ जानेवारी रोजी होत असलेल्या आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणूकीने राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक पक्षांच्या नाराज कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी तयार करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे अनेक पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. नव्याने उदयास आलेल्या परिवर्तन पॅनलने अभ्यासू व समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेल्यांना उमेदवारी दिल्याने पहिल्या निवडणूकीत राजकीय पक्षांना चांगलेज जड जाणार असल्याचे बोलल्या जात आहे. 
नामांकनांच्या छाणणीनंतर नगराध्यक्षपदासाठी ८ आणि नगरसेवक पदासाठी १०४ नामांकन पात्र ठरले होते. आज १७ जानेवारी रोजी नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तसेच आता उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. सध्या नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांनी गुप्तपणे मतदारांमध्ये जावून प्रचार सुरू केला आहे. आता चिन्ह वाटपानंतर उघडपणे प्रचारास गती येणार आहे. सध्या शहरातील प्रत्येक प्रभागात केवळ निवडणूकीचीच चर्चा बघायला मिळत आहे. आता कोणता उमेदवार निवडणूकीत माघार घेतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विविध पक्ष आणि अपक्षांनी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. आता चिन्ह वाटपानंतर कोणता उमेदवार कोणत्या पध्दतीने मतदारांना आकर्षित करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-17


Related Photos