अपघातानंतर पोलिस विभागाने तातडीचे पाऊल उचलल्याने टळले कोट्यवधींचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
काल १६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास  गुरुपल्ली  गावाजवळ आलापल्ली वरुन एटापल्ली - बुर्गी जाणारी बस व   ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने  भिषण अपघात झाला. या अपघातानंतर नागरीकांनी आक्रमक पवित्रा घेत काही वाहने जाळून टाकली. यामुळे पोलिस विभागाने तातडीने बंदोबस्त करीत ६० ते ७० वाहने जाळपोळ करण्यापासून वाचविली. यामुळे कोट्यवधींचे नुकसान टळले आहे.
  बस मधील प्रवासी   प्रकाश  पत्रुजी अंबादे,  शामला प्रभाकर डोंगरे,  अमोल मुंडी गावडे  मंजुळा सोमजी करपे तसेच अन्य जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी या मार्गावरुन जाणारे सुमारे १० ते १५ ट्रकची तोडफोड व जाळपोळ केली. पंरतु पोलीसांनी तातडीने  पावले उचलत अपघातातील जखमींना उपचाराकरीता अहेरी व गडचिरोली येथील रुग्णालयात  भरती केले. सदर घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण होवू लागल्याने पोलीसांनी तात्काळ  घटनास्थळी जावुन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीसांनी जमावास  शांत करीत रस्त्यावरील वाहतुक सुरळीत सुरु केली व रस्त्यावर असणारे ६० ते ७० ट्रकांना जाळपोळ व तोडफोड  होण्यापासुन वाचविले. अपघातास कारणीभूत ट्रक चालका विरुध्द  एटापल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक सुध्दा जखमी झाल्याने  त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे भरती करण्यात आलेले आहे. पोलीसांनी  वेळीच कारवाई केल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात असुन परिसरात शांतता असुन  वरीष्ठ पोलीस अधिकारी   परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-17


Related Photos