महत्वाच्या बातम्या

 मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सातारा येथे जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून मधमाशापालन उद्योगामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या लाभार्थी व संस्थास मधमाशी मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यासाठी मधमाशा उद्योगामध्ये सातेरी, मेलीफेरा व आग्या मधमाशांचे संगोपन  करुन मधाचे उत्पादन घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

सदर मधमाशी मित्र पुरस्काराचे वितरण मध संचालनालय महाराष्ट्र राज्य, खादी व ग्रामोद्योग मंडळ, सातारा येथे २० मे या जागतिक मधमशी दिनानिमित्य होणार आहे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याकरीता जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ वर्धा येथे मधुक्षत्रिक आर.पी. मनोहरे यांच्याशी ०७१५२-२४३३८२, ९४२२७६७१६५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos