पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक एटापल्लीत


- मृतक, जखमींच्या नातेवाईकांची घेतली भेट 
- नागरीकांशी केली चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
काल १६ जानेवारी रोजी एटापल्ली - आलापल्ली मार्गावर गुरूपल्लीजवळ ट्रक आणि बसचा भिषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांना प्राण गमवावे लागले. यानंतर मोठा जनक्षोभ उफाळून आला होता. या घटनेचे गांभिर्य ओळखून राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम, जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व इतर वरिष्ठ अधिकारी आज १७ जानेवारी रोजी एटापल्ली येथे दाखल झाले.
पालकमंत्री ना. आत्राम हे कालच मुंबईहून तातडीने अहेरी येथे दाखल झाले. आज सकाळीच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मृतक तसेच जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले. नागरीकांशी चर्चा केली. दरम्यान एटापल्ली येथे आजही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. पोलिस विभाग परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. घटनेची सखोल माहिती जाणून घेवून मृतकांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना योग्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी दिले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-17


Related Photos