आरमोरी नगर परिषद निवडणूक २०१८-१९ : प्रभावी अंमलबजावणीसाठी पेड न्यूज समिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषद येथील सार्वत्रिक निवडणूक २०१८-१९ चा निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. त्यानुसार आरमोरी नगर परिषदेची निवडणूक दिनांक २७ जानेवारी २०१९ रोजी  घेण्यात येणार आहे.  आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने छापील प्रसारमाध्यमांवर देण्यात आलेल्या पेड न्यूजच्या संदर्भात आलेल्या तक्रारीवर चौकशी करुन निर्णय घेण्यासाठी पड न्यूज समिती निश्चित करण्यात आली आहे.  
या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शेखर सिंह आहेत. तसेच सदस्य म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेष बलकवडे, निवासी उप जिल्हाधिकारी संपत खलाटे, संपादक मुकूंद नारायणभाई जोशी, कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आरमोरीचे समाधान शेडगे, तहसिलदार धाईत हे असून सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-17


Related Photos