माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीऐवजी अर्जदाराला मिळाले वापरलेले कंडोम


वृत्तसंस्था / जयपूर : राजस्थानमध्ये माहिती अधिकाराच्या उत्तरात अर्जदाराला वापरलेले कंडोम मिळाले आहेत. राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील घटना असून अर्जदाराला पेपरमध्ये गुंडाळेले कंडोम मिळाले आहे. राज्य माहिती आयोगाच्या आदेशावर ग्रामपंचायतीकडून हे पत्र पाठवण्यात आले होते.
विकास चौधरी आणि मनोहर लाल यांनी १६ एप्रिल रोजी माहिती अधिकारातंर्गत २००१ पासून विकास योजनांची माहिती मागितली होती. यावर माहिती आयोगाने दोन लिफाफे पाठवले होते. त्यात वर्तमानपत्रात गुंडाळलेले जुने कंडोम निघाले. एका लिफाफ्यात असे कंडोम निघाले तेव्हा त्यांनी दुसरे पाकीट न उघडण्याचा निर्णय घेतला. दोघांनी बीडीओला फोन करून सर्व माहिती दिली व त्यांच्या उपस्थितीत दुसरे पाकीट उघडण्याची विनंती केली.
जेव्हा बीडीओने त्यांची विनंती नाकारली तेव्हा दोघांनी सर्व ग्रामस्थांसमोर पाकीट उघडून त्याचा व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दुसरे पाकीट व्हिडीओ उघडले तेव्हा त्यातही कंडोम निघाले. त्यावर मनोहर लाल यांनी सरकारी संस्थेवर टीका करत हे बाब सरकारी अधिकार्यांचा बेजबाबदार असल्याचे म्हटले. तर जिल्हा परिषद अधिकार्यांनी हे बाहेरच्या माणसाने सरकारी सिस्टममध्ये घुसून हे केले असल्याचे म्हटले.
News - World | Posted : 2019-01-17