महत्वाच्या बातम्या

 वाघाच्या मिशांची तस्करी : नागपूर-भंडारा वनविभागाच्या पथकाची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आराेपींना अटक करण्यात आले असून नागपूर व भंडारा वनविभागाच्या पथकाने संयुक्तपणे सदर कारवाई केले.

माहितीनुसार आराेपी विशेषत: वाघांच्या मिशांची तस्करी करीत हाेते. त्यांच्याकडून या मिशा जप्त करण्यात आल्या आहेत. व्याघ्र शिकारीच्या प्रकरणांशी आराेपींच्या संबंधांची चाैकशी केली जात आहे.
आराेपींमध्ये अशफाक शेख (४२) लाखणी निवासी, प्रकाश मते (४९) तवेपार निवासीव, रवींद्र बारई (४५) सावळी निवासी यांचा समावेश आहे.

भंडारा येथे वाघांच्या मिशांची तस्करी हाेणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाचे पथक नजर ठेवून हाेते. नागपूर वनविभागाचे विशेष पथक तयार करून भंडारा विभागाच्या सहकार्याने १ मे राेजी लाखणी वनपरिक्षेत्रात सापळा रचून संयुक्त कारवाई करीत आराेपींना मिशांसह ताब्यात घेण्यात आले. यावेळी आराेपींकडून १७ मिशा जप्त करण्यात आले.

यावेळी नागपूर प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा व भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनअधिकारी पी.जी. काेडापे, उमरेडचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, प्रमाेद वाडे, य.द. ताडाम, निलेश तवले, गणेश जाधव, दिनेश पडवळ, विनाेद शेंडे, सुधीर कुलरकर, संदीप धुर्वे आणि भंडारा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी हाेते. भंडाराचे वनसंरक्षक साकेत शेंडे हे पुढील तपास करीत आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos