एटापल्ली येथील अपघाताचे गांभिर्य ओळखून पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम तातडीने मुंबईहून गडचिरोलीकडे रवाना


- उद्या देणार घटनास्थळी भेट, जखमींची करणार विचारपूस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
काल १५ जानेवारीपर्यंत अहेरी येथेच मुक्कामी असलेले राज्याचे आदिवासी विकास, वन राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम मुंबईला रवाना झाले होते. मात्र एटापल्ली - आलापल्ली मार्गावरील बस आणि ट्रकच्या भिषण अपघाताची माहिती मिळताच तातडीने गडचिरोलीकडे रवाना झाले आहेत. उद्या १७ जानेवारी रोजी ते घटनास्थळी भेट देतील तसेच रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेणार आहेत.
आज १६ जानेवारी रोजी मुंबईहून नागपूर येथे रात्री ९.२० वाजता दाखल होतील. यानंतर रात्री १२ वाजता अहेरी येथे पोहचतील. अहेरी येथे मुक्कामी राहून उद्या १७ जानेवारी रोजी अपघातातील जखमींची भेट घेणार आहेत. या घटनेबद्दल पालकमंत्री ना. आत्राम यांनी हळहळ व्यक्त केली आहे. मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन करतील. अपघातानंतर झालेल्या परिस्थितीचा आढावासुध्दा पालकमंत्री ना. आत्राम घेणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-16


Related Photos