वट्रा बु. - लंकाचेन रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करा : अजय कंकडालवार


- नागरीकांच्या निवेदनानंतर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंत्यांकडे मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी तालुक्यातील वट्रा बु. - लंकाचेन या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम बंद स्थितीत आहे. हे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.
रस्त्याच्या कामाबाबत नागरीकांनी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट घेवून निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत कंकडालवार यांनी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. या रस्त्याचे काम २०१५ - १६ पासून सुरू करण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही पूर्णत्वास आले नाही. रस्त्याचे काम तुटक - तुटक करण्यात आले आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून काम थंडबस्त्यात आहे. तसेच करण्यात आलेले कामसुध्दा निकृष्ट दर्जाचे आहे. यामुळे कामाची सविस्तर चौकशी करून काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदारास देण्याची मागणी करण्यात आली आहे. अथवा कामाचे कंत्राट रद्द करून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली जात आहे. रस्त्याचे काम १५ दिवसात सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ फेब्रुवारीपासून ग्रामस्थ आंदोलन करतील, असाही इशारा देण्यात आला आहे.
जि.प. उपाध्यक्षांना निवेदन देताना, आवलमरीच्या सरपंचा सुनंदा कोडापे, उपसरपंच चिरंजिव चिलवेलवार, माजी सरपंच मारोती मडावी, ग्रा.पं. सदस्य वसंत तोर्रेम, नामदेव मडावी, सुरेश तलांडे, मळू गंडाकोटा यांच्यासह असंख्य नागरीक उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-16


Related Photos