महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर : महाराष्ट्र दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : 
बल्लारपूर शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषद कार्यालय मध्ये मुख्याधिकारी विशाल वाघ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगर परिषद चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, शासकीय विश्राम गृह मध्ये सा. बा. विभागचे अधिकारी नितीन मुत्यालवार, ग्रामीण रुग्णालय येथे डॉ. विजय कळसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपन्न झाले. उपविभागीय अधिकारी दिप्ती सुर्यवंशी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार चरडे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंह चंदेल तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे व तहसील कार्यालयचे अधिकारी व कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्राध्यापकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos