देलोडा बिटाचा वनरक्षक अतुल धात्रक अडकला एसीबीच्या जाळ्यात


- रेतीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याकरीता घेतली दहा हजारांची लाच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
रेतीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडून देण्यासाठी तसेच भविष्यात कारवाई न करण्यासाठी १५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून दहा हजार रूपये स्वीकारताना आरमोरी तालुक्यातील मरेगाव उपक्षेत्रातील देलोडा बिटाचा वनरक्षक अतुल प्रभाकर धात्रक (३४) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. 
एसीबी गडचिरोलीकडे प्राप्त तक्रारीवरून काल १५ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी पंचासमक्ष तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारताना आरमोरी येथील जुने बसस्थानक परिसरात रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरूध्द आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक मिलींद तोतरे, पोलिस उपअधीक्षक डी.एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहाय्यक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थु पोटे, नापोशि सतिश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई महेश कुकडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सुभाष सालोटकर, महिला पोलिा शिपाई सोनी तावाडे, सोनल आत्राम, चालक तुळशिराम नवघडे, घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-01-16






Related Photos