ट्रक - बस अपघातातील मृतकांची संख्या वाढणार, जमावाने ट्रक पेटविला


- सुरजागड पहाडीवर जाणारी वाहने अडविली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
कोमल चिटमलवार / एटापल्ली :
सकाळीच झालेल्या ट्रक आणि बसच्या भिषण अपघातातील मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला आहे. तसेच सुरजागड पहाडीकडे जाणारे इतरही ट्रक नागरीक अडवत असून हिंसक वळण घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहेरी आगाराच्या एटापल्ली - आलापल्ली बसला ट्रकने चिरडत नेले. यामुळे बसची एक बाजू पूर्णतः क्षतीग्रस्त झाली. यामध्ये अनेक जण दबल्या गेले. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आणखी मृतदेह दबून असल्याची माहिती आहे. जखमींपैकी काही जण गंभीर असून मृतकांचा आकडा वाढू शकतो. घटनास्थळी हजारोंच्या संख्येने नागरीक गोळा झाले आहेत. यामुळे मार्ग पूर्णतः जाम झाला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-16


Related Photos