एटापल्ली - आलापल्ली मार्गावर ट्रक - बसचा भिषण अपघात, पाच ते सहा जण ठार झाल्याचा अंदाज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / एटापल्ली :
एटापल्ली - आलापल्ली मार्गावर गुरूपल्ली गावाजवळ बस आणि ट्रकचा भिषण अपघात झाला. या अपघातात पाच ते सहा जण ठार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृतकांमध्ये आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालयातील ३ विद्यार्थिनींचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
एमएच ३१ सिक्यू ३३८६ क्रमांकाचा ट्रक आणि एमएच ४० एक्यू ६०३४ क्रमांकाच्या बसची गुरूपल्ली गावाजवळ भिषण अपघात झाला.   भरधाव ट्रक बसवर धडकला. अपघात एवढा भिषण आहे की टकने अर्धी बस चिरडत नेली. यामुळे पाच ते सहा ठार झाल्याचा अंदाज आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असल्याची शक्यता आहे. बस अहेरी आगाराची आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-16


Related Photos