महत्वाच्या बातम्या

 मार्कंडा देवस्थानच्या मंदिरातील अडथळे दूर करून जागृती अधिष्ठान व जलाभिषेकाच्या कार्यक्रमाचे आयोजन : आमदार डॉ. देवराव होळी


- मार्कंडा देवस्थानच्या मंदिराचे निर्माण कार्य पुर्ण होण्यासाठी व जीर्णोद्धारासाठी तालुक्यातील सर्व मंदिर समितीच्या धर्माचार्यांशी आमदार डॉ. देवराव होळी यांची चर्चा

- ५ मे पासून १५ मे पर्यंत महादेव जागृती अधिष्ठान तर १५ मे ला मार्कंडा देवस्थान येथे होणार जलाभिषेक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून मार्कंडा देवस्थानचे दुरुस्तीचे काम सुरु असून ते काम थांबलेले आहे. ते थांबलेले काम पुर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही मंदिर काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे हे काम पुर्ण व्हावे व त्यामध्ये येणारे अडथळे दूर व्हावे यासाठी हिंदु परंपरेनुसार देवी-देवतांचे भगवान महादेवाचे जागृती अधिष्ठान व जलाभिषेक कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी दिली.

आमदार डॉ. देवराव होळी यांनी यासंदर्भात मार्कंडा देवस्थानचे पदाधिकारी, मंदीर परिसरातील पुजारी, तालुक्यातील मंदिरांचे धर्माचार्य, भक्त भावीक यांच्यासोबत मार्कंडा देवस्थान बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीला संघाचे जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा, उपविभागीय अधिकारी तोडसाम, तहसीलदार नागटिळक, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, हरणघाट येथील मुरलीधर महाराज, गायत्री परिवाराचे दीनानाथ गवारे, रामप्रसाद महाराज मंदिराचे नानाजी बुरांडे, इस्कॉन मंदिर कृष्णनगरचे महाराज, तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, कोमेरवार, लोमेश बुरांडे, सावसाकडे, प्रेमा आईंचवार, मनीष गांधी, हरीश गांधी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, जेष्ठ नेते जयरामजी चलाख, अमोल महाराज आमगावकर, हनुमान मंदिर चामोर्शी येथील अनिल महाराज चलाख, तालुका महामंत्री भोजराज भगत, अमोल आईंचवार, यश गन्यारपवार, मंदिर परिसरातील सर्व पुजारी धर्माचार्य व तालुक्यातील भक्त भाविक प्रामुख्याने उपस्थित होते.

मार्कंडा देवस्थानचे दुरुस्ती व पुनर्निर्माण करण्यासाठी २०१४ पासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून मंदिर खोलण्यात आले. मात्र ८-९ वर्षाचा कालावधी होऊनही अजूनपर्यंत या मंदिराचा अर्धाही भाग पूर्ण झालेला नाही.

त्यामुळे या संदर्भात काही धार्मिक अडीअडचणी येत असल्यास त्या धार्मिक विधी करून दूर करण्याची आवश्यकता असून त्याकरीता हिंदू परंपरेनुसार हिंदू देवी देवतांचे व महादेवाचे जागृती अधिष्ठान व जलाभिषेक करणे आवश्यक असल्याची कल्पना आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी मांडली. या संदर्भात परिसरातील सर्व भक्त, भाविक, मंदिरांच्या सर्व धर्माचार्यांना सोबत घेऊन मार्कंडा देवस्थान येथे मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी या बैठकीमध्ये केली. त्याला सर्व धर्माचार्यानी व भक्त भाविकांनी अनुमती दर्शविली. त्यानुसार मार्कंडा देवस्थान येथे ५ मे पासून १५ मे पर्यंत हिंदू परंपरेनुसार हिंदू देवी देवतांचे व महादेव जागृती अनुष्ठान व १५ मे रोजी भव्य जलाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित झाले. असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी दिली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos