शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आता सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यासाठी केंद्राच्या तिजोरीवर १ हजार २४१ कोटींचा भार पडणार आहे. मात्र, याचा लाभ राज्यातील २९ हजार शिक्षकांना तर खासगीतल्या ३ लाख शिक्षकांना मिळणार आहे. त्याचबरोबर देशातील पदवी स्तरावरील तांत्रिक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
यासाठी केंद्र सरकार ७ व्या वेतन आयोगाच्या खात्यामध्ये या संस्थांकडून होणाऱ्या एकूण (१.१.२०१६ ते ३१.३.२०१९पर्यंत) अतिरिक्त खर्चापैकी ५० टक्के निधी जमा करणार आहे. दरम्यान, ६८ लाखांपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार किमान वेतन आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढीची मागणी करीत आहेत. त्यामुळे त्यांना आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच फायदा मिळण्याची शक्यता आहे.



  Print






News - World | Posted : 2019-01-16






Related Photos