महत्वाच्या बातम्या

 नागपूर : जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पो.स्टे. एम.आय.डी.सी. बोरी अंतर्गत काठीवाडयाच्या समोर नागपुर वर्धा रोड येथे ३० एप्रिल २०२३ ला ०३.०० वा. दरम्यान एम. आय. डी. सी. बोरी पोलीसांना गुप्त माहिती मिळाली. कि, टाकळघाट शिवायत नागपूर वर्धा रोड ने काठीवाडी धावा समोर काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून एम. आय. डी. सी. बोरी पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता एक बिना नंबरचे बोलेरो संशयीत वाहन मिळून आल्याने त्या वाहना जवळ जावून त्याचा पाहणी केली असता सदर वाहनात एकुण चार पांढऱ्या रंगाचे दोन लाल रंगाने जनावरे निर्दयतेने कोंबलेले, त्या जनावरांचे पायाला व तोंडाला दोरीने बांधुन दिसले. यावरुन वाहन चालकास त्याचे व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव आरोपी चालक विनोद हरिचंद्र खेडकर व ३२ वर्ष रा. भुगाव ता. कामठी जि. नागपुर व त्याचे शेजारी बसलेला निखील कैलास बनकर वय २५ वर्ष व. किन्ही ता. कुडी जिं. नागपुर ह. मु. भुगाव ता. कामठी जि. नागपुर असे सांगीतले.

सदर जनावराबाबत विचारपुस केले असता सदर जनावरे हे शिहोरा बाजार ता. जि. भंडारा येथून आणून तमाळ येथे कत्तलखान्यात कटाई करीता घेऊन जात असल्याचे सांगतले. सदर वाहन चालकास जनावराचे व वाहनाचे कागपत्राबाबत विचारले असता त्याच्याकडे जनावरे बाबतसे कोणतेही कागज पत्र नसल्याचे सांगितले. तसेच सदर जनावरे हे स्वतः विकत घेतल्याचे सांगितले. 

सदर वाहनासंबंधीच चालवण्याचा परवाना मिळून आला नाही. सदर वाहनामध्ये ०४ पांढरे रंगाचे बैल व ०२ लाल रंगाचे बैल असे एकूण ०६ जनावरे कि.मी.  अंदाजे ६०,०००/-रुपये पिकअप क्र. MH 40, CM 0595 किमी अंदाजे ९,००,०००/- रु. असा एकुण वाहनासह ९,६०,०००/- रु. या मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोउपनि शिवाजी मारोती भताने, वय ४५ वर्षे पोलीस स्टेशन MIDC बोरी यांचे रीपोर्टवरून पोस्टे एमआयडीसी बोरी येथे आरोपीविरुध्द कलम ११११) (क) प्राण्याचा छळ अधिक ५१.) (५२) म... अधम ३४ भादंवि कायदाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याचा तपास पोस्टे. एमआयडीसी बोरी हे करीत आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos