महत्वाच्या बातम्या

 सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय : घटस्फोटासाठी सहा महिन्यांच्या प्रतिक्षेची गरज नाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नातेसंबंध सुधारण्यासाठी वाव नसेल तर, त्या दांपत्याला घटस्फोटासाठी सहा महिन्यांच्या प्रतीक्षेची गरज नाही.

त्यासाठी कलम १४२ अंतर्गत नातेसंबंधांच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला जाऊ शकतो. या महत्त्वाच्या निर्णयामुळे प्रतिक्षेत असलेल्या दांपत्याला दिलासा मिळाला आहे.

विवाह कायद्यानुसार एखाद्या जोडप्याला घटस्फोट घ्यायचा असल्यास त्यांचे समुपदेशन करून नातेसंबंध सुधारण्यासाठी ६ महिन्यांचा अवधी दिला जातो. मात्र त्या नातेसंबंधांना सुधारण्यासाठी वाव नसेल तर सहा महिन्यांच्या कालावधीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने नव्या नियमाप्रमाणे, परस्पर संमतीने घटस्फोटासाठी ६ महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती अभय एस ओक, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या घटनापीठाने कलम १४२ चा हवाला दिला आणि हिंदू विवाह कायद्यांतर्गत विहित सहा महिन्यांचा कालावधी रद्द करता येईल असा निर्णय दिला.





  Print






News - Rajy




Related Photos