महत्वाच्या बातम्या

 आरोग्य विभागात तब्बल १० हजार २७ जागांची पदभरती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई :  राज्य सरकारने आरोग्य विभागातील भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आरोग्य विभागात तब्बल 10 हजार 27 जागांची पदभरती केली जाणार आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश असणार आहे. या भरतीबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांनी केली आहे.

आरोग्य विभागातील भरतीच्या या घोषणेमुळे राज्यातील अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. या भरतीची जाहीरात 1-7 जानेवारी 2023 दरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 26-27 मार्च 2023 ला परीक्षा होणार आहे. 

कोरोना काळात आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा चांगला कस लागला. मात्र देशाला कोरोनामुक्त करण्याचा चंगच या आरोग्य कर्मचाऱ्यांनी बांधला होता. कोरोना काळात या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन रुग्णांची सेवा केली. आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता अनेक महिनोमहिने दूर राहून त्यांनी रुग्णांची सेवा केली. 

दरम्यान या काळातच आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण आला होता. मात्र आता या आरोग्य कर्मचांऱ्यांवर अधिकचा ताण येऊ नये म्हणून सरकारने या भरतीची घोषणा केलीय. या भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर असलेला अधिकचा भार कमी होईल. तसेच युवांना रोजगारही मिळेल. 





  Print






News - Rojgar




Related Photos