मांडूळ सापाच्या तस्करी प्रयत्नातील ४ आरोपी अटकेत, एक फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
दुर्मीळ अशा मांडूळ जातीच्या  सापाची तस्करी करताना वनविभागाने ४ युवकांच्या मुसक्या आवळल्या.  ही कार्रवाई सोमवारी रात्री ७ वाजता शहरातील गोपूरी चौकात करण्यात आली़  आरोपींकडून २ दुचाकी वाहन, ३ मोबाईल व मांडूळ जातीचा साप जप्त केल्याची माहिती असून १ आरोपी फरार आहे. 
  सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापांची तस्करी केल्या जात असल्याची याची माहिती पिपल्स फॉर  ॲनिमल व वनविभागाला  प्राप्त झाली.   या प्रकाराची गंभीर दखल घेत सोमवारी वनविभागाच्या वतिने दिवसभर तपासाची चक्रे फिरवीत माहिती प्राप्त केली.   गोपुरी चौकात सापांची लाखो रुपयांमध्ये विक्री करण्याचा सौदा होणार होता़  यानंतर वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनात वनकर्मीचारी व पिपल्स फॉर ॲनिमल्स च्या सदस्यांनी परिसरात सापळा रचला.   तस्कर घटनास्थळी पोहचताच वनविभागाची टीम येथे पोहोचली.  अचानक झालेल्या या कारवाईमुळे तस्कर मार्ग भेटेल तेथून पळत सुटले.   वनविभागाच्या वतिने ४ तस्करांना ताब्यात घेतले आहे.  तर ३ आरोपी घटनास्थळाहून फरार झाले.  ताब्यातील आरोपी देवळी तालूक्यातील पळसगाव येथील आशिष सालोडकर, आकाश कौरती, साटोडा येथील गोविंद जाधव, आलोडी येथील नितेश चहांदे असे आहे.   आरोपींकडून २ दुचाकी वाहने, ३ मोबाईल, मांडूळ साप जप्त करण्यात आला.  सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ कलम २(१६), २(३६), ९,३९(१), ३९(३), ४८, ४९, ५० व ५१  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार तस्करांमधील एकाने हा साप बुलढाणा येथून दीड लाखात खरेदी केला.   ज्याची विक्री १५ लाखांमध्ये होणार होती़ 

वेशांतर करुन कर्मचारी तैनात

सोमवारच्या रात्रीतील या कारवाईमध्ये वनविभागाचे कर्मचारी साधूंचे वेशांतर करून परिसरात पोहचले़  तस्करांना सुगावा लागण्याच्या आत तस्कर पोहचताच वनकर्मचा-यांनी पिपल्स फॉर ॲनिमलच्या सहाय्याने ही कारवाई केली.   Print


News - Wardha | Posted : 2019-01-15


Related Photos