एक हजारांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी व लेखालिपीक अडकले एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
औषधांची देयके मंजूर करण्यासाठी एक हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तुमसर येथील उपकोषागार अधिकारी कार्यालयातील उपकोषागार अधिकारी व लेखालिपीकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
उप-कोषागार अधिकारी  अशोक केशवराव लेंडे , लेखालिपीक संजय नरेंद्र श्रीपाद  असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार हे बावनथळी काॅलनी तुमसर जि. भंडारा येथील रहीवासी असुन उप-जिल्हा रूग्णालय, तुमसर येथे औषध निर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत असुन रजिस्टर औषधी पुरवठादारांचे बिले तसेच बाहेरून विकत घेतलेल्या औषधाचे बिले प्रमाणीत करून सदर बिलाचे देयके कोषागार कार्यालयात देण्याची कामे करतो. उप-कोषागार अधिकारी कार्यालय, तुमसर, जि. भंडारा येथे आठ रजिस्टर औषधी पुरवठा धारकाचे औषधाचे  १० जानेवारी रोजी एकुण बिले ५६ हजार ५११ रूपयांचे देयके सादर केले होते. उप-कोषागार अधिकारी कार्यालय, तुमसर येथे कार्यरत अशोक   लेंडे व संजय   श्रीपाद या दोघाना भेटले असता त्यांनी तक्रारदारास औषधांची बिले मंजुर करण्याकरीता  १ हजार रू लाचेची मागणी केली.  याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा तर्फे आज १५ जानेवारी रोजी    सापळा कार्यवाही आयोजीत केली असता सापळा कार्यवाही दरम्यान अशोक   लेंडे व संजय नरेन्द्र श्रीपाद यांनी    तक्रारदाराकडुन   लाचेची मागणी करून अशोक   लेंडे यांनी   लाचरक्कम स्विकारली. यावरून आरोपीविरूध्द पो. स्टे. तुमसर   येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा (सुधारीत) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही   पोलीस अधिक्षक  श्रीकांत धिवरे, (अतिरिक्त कार्यभार ) अपर पोलीस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात मार्गदर्शनात , पोलीस उपअधीक्षक  महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सचिन हलमारे, पोलिस शिपाई गोस्वामी, शेखर देशकर, पराग राऊत, कृणाल कडव, चालक दिनेश  धार्मिक यांनी केली आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-01-15


Related Photos