महत्वाच्या बातम्या

 ठाणेगाव येथे ३ मे ला भरणार शासकीय योजनांची जत्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण योजनेअंतर्गत तहसील कार्यालय आरमोरी यांच्या वतीने ३ मे २०२३ बुधवारला आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे महाराजस्व अभियान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याशिबीरात विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ नागरिकांना, शेतमजुरांना देण्यात येणार आहे.          

शासकीय योजनांची जत्रा या शिर्षकाखाली महाराजसव अभियान २०२३ आयोजित करण्यात आले आहे. ठाणेगाव येथील लिसीट हायस्कूल आश्रमशाळा येथील पटांगणावर सकाळी १०:०० वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष स्थानी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे.पी. लोंढे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हरिराम वरखडे, माजी आमदार रामकृष्ण मडावी, माजी आमदार आनंदराव गेडाम, ठाणेगाव येथील सरपंच वासुदेव मंडलवार उपस्थित राहणार आहेत. 

सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न ताबडतोब निकाली काढण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना शेतमजुरांना देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पशुधन विभाग, पंचायत समिती विभाग, शिक्षण विभाग इत्यादी यामध्ये आधार केंद्र यांचे स्टाल लावुन त्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या शिवाय  रेशन कार्ड तयार करणे, जातीचे दाखले अधीवास प्रमाणात तयार करणे, वनहक्क संगणीकृत ७/१२ चे वाटप, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, आधार कार्ड अद्यावत करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. याकरिता या शिबिराचा ठाणेगाव व परिसरातील नागरिकांनी व शेतकरी यांणी  जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरमोरीचे तहसीलदार  ललीतकुमार लाडे व ठाणेगाव साझाचे तलाठी संकेत कात्रटवार यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos