महत्वाच्या बातम्या

 सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या घडीपुस्तिकेचे विमोचन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सामाजिक न्याय विभागाकडून निर्मित जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित माहिती पुस्तिका व घडीपुस्तिकेचे विमोचन आज महाराष्ट्र दिनानिमित्य जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहूल गवई, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची विस्तृत माहिती या घडीपुस्तिकेत दिलेली आहे. मुद्रित माध्यमाच्या सामर्थ्यामुळे वाचनात आलेल्या योजनांची माहिती विद्यार्थी, नागरिकांसाठी उपयुक्त आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा सविस्तर लेखा जोखा या पुस्तिकांमध्ये दिला असल्याने विभागाला मदत  होईल, असे मत सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.





  Print






News - Bhandara




Related Photos