वर्धा येथे मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना घेतले ताब्यात


- मुख्य आरोपी फरार, १४ लाखात झाला होता सौदा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
गुप्तधन काढण्यासाठी मांडूळ सापाची १४ लाखात विक्री करण्याच्या बेतात असलेल्या पाच जणांना वनविभागाच्या पथकाने आज पहाटे ताब्यात घेतले आहे. हा मांडूळ साप शेगाव येथून आणण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यातील मुख्य आरोपी फरार झाला आहे.
मांडूळ सापाची शेगाव येथून तस्करी करून भोपाळ ला विक्री केली जाणार असल्याची माहिती वनविभागास मिळाली. यावरून सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या सापाचा १४ लाखात सौदा झाला होता. सदर कारवाई गोपुरी चौकात करण्यात आली. याप्रकरणी मुख्य आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या गुन्ह्यात १० जणांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे कळू शकली नाहीत. पुढील तपास सुरू आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2019-01-15


Related Photos