उपशिक्षणाधिकारी चलाख यांच्यावर कारवाई करा


- पुरोगामी शिक्षक समीतीचे पालकमंत्र्यांना निवेदन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी
: जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गडचिरोली  तालुक्यातील गीलगाव येथे आयोजित शालेय बाल क्रिडा संम्मेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी (प्राथ) मारोती चलाख यांनी आपल्या भाषणात शिक्षकांप्रती अपमानजनक वक्तव्य करुन एका शिक्षकाला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली.त्यामुळे उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांच्यावर  नियमानुसार कारवाई करावी याबाबतचे निवेदन पालकमंत्री ना राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना  महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समीती संघटना, तालुका शाखा अहेरी यांनी दिले.
 शिक्षक विद्यार्थ्यांना  न शिकविता फुकटचा पगार घेतात. मी अशा शिक्षकांना सोडणार नाही.त्याना बघुन घेईल.या वक्तव्याबाबत शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष धनेश कुकडे यांनी चलाख यांना विचारले असता उलट चलाख यांनी कुकडे यांना आपल्या स्वतःचे वाहनात जबरदस्तीने बसवून पोलिसात तक्रार दाखल केली. उपशिक्षणाधिकारी चलाख यांचे हे कृत्य नियम बाह्य व हुकूमशाहीचे आहे. या प्रकारामुळे सर्व शिक्षकांचा अपमान झाला आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या  शिक्षकांना अशा प्रकारची वागणूक दिल्यामुळे जिल्हातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येत उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांचेवर कारवाई करण्याबाबतची मागणी लावून धरली आहे. आज १५ जानेवारी रोजी सर्व शिक्षक संघटना कडून जिल्हा परिषदे समोर आंदोलन करण्यात येत आहे.  चलाख यांचेवर प्रशासनाने  कारवाई न केल्यास जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करु व पुढे होऊ घातलेल्या तालुका व जिल्हास्तरीय क्रिडा संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा ईशारा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समीती संघटना तालुका शाखा अहेरी यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदन देताना विभागीय अध्यक्ष मधुकर सडमेक,तालुका अध्यक्ष रविंद्र यमसलवार,अशोक पुसालवार,सुरेश कलपल्लीवार, महेश मडावी, वसंत सडमेक, सुंदरदास सडमेक, प्रभाकर श्रीरामवार, श्रावन दुर्गे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. .
आपण सदर प्रकरणात लक्ष घालुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य चौकशी करुन कारवाई करण्याबाबतचे आश्वासन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना  दिले. 

 मी मंचकावरुन कोणतेही अभद्र वक्तव्य केले नाही. आपल्याला शिक्षकांप्रती नेहमीच आपुलकी आहे. माझ्या भाषणाची आडीयो / व्हिडीओ क्लीप चौकशी करीता वरिष्ठांकडे सादर करावी. जर त्यात सत्यता असल्यास वरिष्ठ मला जी शिक्षा देतील त्याचे मी स्वागतच करेल.मी जे  काही केले ते नियमानुसारच केले.  त्यामुळे आपण कोणत्याही दबाव तंत्राला घाबरणार नाही. 
      मारोती चलाख 
उपशिक्षणाधिकारी(प्राथ)
   जि.प.गडचिरोली .  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-15


Related Photos