महत्वाच्या बातम्या

 स्वामी विवेकानंद जुनियर कॉलेज गडचिरोली येथील पाच विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : स्वामी विवेकानंद जूनियर सायन्स कॉलेज मधील पाच विद्यार्थी कुठल्याही ट्युशन शिवाय जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झाले असून जेईई ऍडव्हान्स परीक्षेकरिता पात्र ठरलेले आहेत.

माहितूनुसार कॉलेज शिवाय कुठल्याही प्रकारचे ट्युशन नाही. कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांच्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा तसेच जेईई आणि नीट परीक्षेची तयारी करून घेतली जाते. नियमित कॉलेज व विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांचे पेपर्स घेतले जातात. एनटीए मार्फत दरवर्षी दोनदा जेईई मेन्स परीक्षा घेण्यात येते. त्या परीक्षेमधून जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र होतात. जेईई ॲडव्हान्स परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये प्रवेश मिळतो. जेईई मेन्स परीक्षेच्या गुणावरून एनआयटी मध्ये प्रवेश मिळतो.

यावर्षी देशभरातून सुमारे साडेनऊ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स ही परीक्षा दिली. त्यापैकी सुमारे अडीच लाख विद्यार्थी ऍडव्हान्स साठी पात्र झाले. अतिशय उत्कृष्ट असा शिक्षक वर्ग आणि नियमित होणाऱ्या पेपर्सचा सराव यामुळे विद्यार्थी यश संपादित करतात.

यामध्ये थर्व बारापात्रे, कृष्णकांत मैंद, राहुल आखाडे, रिया मेश्राम, रितिका गोहने यांनी जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झाले असून जेईई ऍडव्हान्स परीक्षेकरिता पात्र ठरलेले आहेत.

यावेळी कॉलेजच्या प्राचार्या संगीता अतकमवार, कॉलेजचे अध्यक्ष सतीश चिचघरे, शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos