महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने फडकविला झेंडा


- महाविकास आघाडीचा १८ पैकी ११ जागेवर विजय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे १८ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडले आणि २९ एप्रिल २०२३ ला मतमोजणी झाली. त्यामधे महाविकास  आघाडीने १८ पैकी ११ जागेवर दणदणीत विजय मिळवला. कॉंग्रेस समर्पित गटाच्या परिवर्तन पॅनलने चर्चस्व प्रस्थापित करीत सिंदेवाही कृषी बाजार समीतीवर काँग्रेसने सत्ता काबीज केली. तर भाजप समर्थित गटाला ७ जागेवर समाधान मानावे लागले.

सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक काँग्रेस पक्षाने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात लढविली. या अटीतटीच्या निवडणूकीत कॉग्रेस पदाधिकारी, कार्यकर्तानी विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न केल्याने विजयश्री खेचून आणण्यात यश आले.

सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समीतीतील १८ उमेदवार विजयी झाले. त्यामधे सहकार गटातुन ११ उमेदवार रमाकांत लोधे, संजय पुपरेड्डीवार, चंद्रशेखर हटवादे, दादाजी चौके, नरेंद्र भैसारे, भास्कर घोडमारे, श्रीराम डोंगरवार, जयश्री नागापूरे, कल्पना डोंगरवार, राजेंद्र बोरकर, मधुकर जल्लावार, ग्रामपंचायत गटातुन ४ त्यापैकी राहुल बोडणे, जगदीश कामड़ी, सुखदेव चौके, जानकीराम वाघमारे यांचा समावेश आहे. तर व्यापारी, अडते आणि हमाल गटातुन ३ मंगेश गभणे, नरेंद्र गहाणे, नामदेव मोहुर्ले, यांचा विजय झाला. कॉंग्रेस समर्पित महाविकास आघाडीने गुलाल आणि फटाक्याच्या आतिशबाजीने विजय उत्सव साजरा केला.





  Print






News - Chandrapur




Related Photos