कुरखेडा पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार


- मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांना दिले निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
पंचायत समिती सदस्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकत असल्याबाबतचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री यांना देण्यात आले आहे. 
सभापती व उपसभापतींना स्वतंत्र वाहन देण्यात यावे, १४ वा वित्त आयोगाचा निधी पंचायत समिती स्तरावर देण्यात यावा, प्रत्येक पंचायत समिती सदस्यांना आपल्या गणातील विकासकामांसाठी वार्षिक ५० लाखांचा निधी देण्यात यावा, पंचायत समिती सभापतींचे मानधन २० हजार रूपये व पंचायत समिती उपसभापतींना १५ हजार, सदस्यांना १० हजार रूपये मानधन देण्यात यावे, विधानपरिषद निवडणूकीत पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, जिल्हा नियोजन समितीवर एका सदस्याची निवड करण्यात यावी, प्रत्येक पंचायत समिती सदस्यांना पाच घरकुलाचे वार्षिक लक्षांक देण्यात यावे, कृषी उत्पन्न बाजार समितीत एका पंचायत समिती सदस्याची निवड करण्यात यावी, प्रवास व बैठक भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देताना सभापती गिरीधारी तितराम, उपसभापती मनोज दुनेदार, सदस्या कविता गुरनुले, सदस्य बौध्दकुमार लोणारे, सदस्या शारदा पोरेटी, सदस्या संध्याताई नैताम, सदस्या माधुरी मडावी उपस्थित होत्या.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-14


Related Photos