गोठणगाव - चांदागड मार्गावर कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात , युवक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : 
भरधाव चारचाकी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यानजीक असलेल्या खड्यात उलटल्याने एका युवकाचा मृत्यु झाल्याची  घटना १३ जानेवारी च्या रात्री   १२:३० वाजताच्या सुमारास गोठणगाव -  चांदागड रस्त्यावर घडली . चालक घटनास्थळावरून पसार झाला असल्याची  माहिती प्राप्त झाली  आहे
 अपघातात प्रल्हाद भाष्कर उसेंडी (२२) रा देवखडकी ता आरमोरी याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.  भाष्कर हा कूरखेडा येथील व्यावसायिक बालकिसन भट्टड यांच्याकडे कामाला होता.  भट्टड यांच्याकडे व्यथा शेतकऱ्याची हा लघुपट जिल्ह्याचा ग्रामीण भागात दाखविण्याचा कंत्राट आहे.  याच कामाकरीता त्यांच्या  वाहनावरील चालक संजय केवळराम दर्रो रा मोहगाव व मृतक प्रल्हाद उसेंडी हे पेंढरी हद्दीतील दुर्गापूर येथे गेले होते.  रात्री  तिथून परत येत असताना कूरखेडा पासून ६ किलोमीटर अंतरावर गोठणगाव ते चांदागड दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्याने वाहन रस्त्याचा कडेला उलटले.  अपघातात गंभीर जखमी उसेंडी याला लगेच येथील उपजिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले.  मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने रात्री दिड वाजता त्याचा मृत्यु झाला. कुरखेडा पोलिसांनी पंचनामा करीत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र चालक फरार आहे व त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यानी दिली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-14


Related Photos