पोलिसांची कार ट्रकवर आदळली, अपघातात ४ ठार तर ३ जण गंभीर जखमी


-जखमी मधे इंदौर पोलीसचे पीएसआय सह ३ कर्मचारी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बुलढाणा :
जिल्ह्यातील मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे ५.३० वाजेदरम्यान घडली. जखमीमध्ये इंदोरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनच्या पिएसआयसह ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नांदुरा ते मलकापूर रोडवरील काटी फाट्याजवळ ही घटना घडली. 
राष्ट्रीय महामार्गावरील अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. महामार्गाचे काम थांबले असल्याने रस्त्यात जागोजागी खड्डे अजूनही कायम आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडचण निर्माण झाली आहे. सोमवारी पहाटे इंदौरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक व काही कर्मचारी अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीस व त्याच्या नातेवाईकांना घेवून सिंगरोलकडे  जात होते. दरम्यान त्यांची कार नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. कारचा वेग जास्त असल्याने ही कार मागून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळली. अपघातात पोलिसांच्या कारमधील ४ जण ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत. या कारमधील भाविक इंदौर येथील रहीवाशी असून तीघे मित्र गुरुद्वारा येथून दर्शन आटोपून घराकडे निघाले होते. अपघातातील जखमींना प्रथम वडनेर भोलजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर मलकापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2019-01-14


Related Photos