महत्वाच्या बातम्या

 मासोद येथे डिजिटल साहित्याचे लोकार्पण व यशोगाथेचे प्रकाशन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आदर्श शाळा विकास उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्रथमिक शाळा मासोद ता. कारंजा येथे व्हिएसटीएफ सीएसआर निधीतून विद्यार्थी गुणवत्ता विकासाकरिता खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी यशोगाथा पुस्तकेचे देखील प्रकाशन करण्यात आले.


कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रविण कुऱ्हे, सरपंच सवर्णा तागडे, विस्तार अधिकारी धनंजय उमेकर, राजू मस्के, केंद्रप्रमुख विनोद बारापात्रे, मुख्याध्यापक हेमराज बढीये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज निकोसे उपस्थित होते.


आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्याचा विकास करणे व व्यावसायिक शिक्षणाची तोंडओळख होण्याच्यादृष्टीने शाळेमध्ये डिजीटल शिक्षणासह आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने ऑनलाईन शिक्षण साहित्य, इंटरॲक्टीव बोर्ड, प्रत्येक वर्गात साऊंड सिस्टीम संच, कॅाम्पुटर लॅबची दुरुस्ती, प्रिंटर, लॅमिनेशन, वाचनालयासाठी पुस्तके, गुणवत्तापूर्ण शिक्षण व करियर मार्गदर्शन आणि समूपदेशन यात स्थानिक पातळीवर कौशल्यावर आधारीत रोजगार व उच्च शिक्षणाच्या संधीची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात येत आहे.


शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करून गावांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालय, पिण्यासाठी शुध्द पाणी, हॅन्डवॉश स्टेशन, मैदान सपाटीकरण, खेळाचे साहित्य व भौतिक सुविधांची किरकोळ दुरूस्ती करून शाळांची बाल संकल्पनेच्या धर्तीवर रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सायन्स लॅब, मिनी सायन्स सेंटर, सौर उर्जेचा वापर उपक्रमांचा समावेश आहे.


याप्रसंगी प्रस्ताविकेतून मुख्याध्यापक बढीये यांनी शाळा विकास व विद्यार्थी गुणवत्ता विकासाकरिता केलेल्या कार्याची माहिती दिली. प्रविण कुऱ्हे यांनी कृती संगमातून शाळा विकास कसा साधता येतो, व्हीएसटीएफ आदर्श शाळा संकल्पना काय आहे यावर मार्गदर्शन केले. शिक्षणासोबतच नाविण्यपूर्ण गोष्टींद्वारे राबविलेल्या उपक्रमाचे दीपक गुढेकर यांनी लेखन करुन तयार केलेली सचित्र पुस्तिका उपक्रमातून मुल्यासंवर्धन’चे याप्रसंगी प्रकाशन करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्याचा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन किरण पालीवाल यांनी केले तर आभार स्मिता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर गवळी, गुणवंत तिनघसे, दीपक गुढेकर, सुशीला धुर्वे, दिव्या सिराम, नायदाबाई शेख, अर्चना सिराम, रुपाली मसराम यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Wardha




Related Photos